Join us
Daily Top 2Weekly Top 5

१३व्या वर्षी दूध आणि पेपर टाकत सुरुवात; आज ४०० अलिशान गाड्यांचा मालक; एका निर्णयाने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:59 IST

Ramesh Babu Success Story : १३ वर्षी वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्या मुलावर आली. अशाही परिस्थितीत पेपर आणि दूध टाकून त्याने शिक्षण पूर्ण केले. आज त्याच्याकडे ४०० अलिशान गाड्या आहेत.

Ramesh Babu Success Story : "नशिबात काय आहे यापेक्षा तुमच्या मनगटात काय आहे, यावर तुमचं यश अवलंबून असतं," हे बेंगळुरूच्या रमेश बाबू यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरोघरी दूध आणि वर्तमानपत्रे वाटणारा हा मुलगा आज चक्क ४०० पेक्षा जास्त लक्झरी गाड्यांचा मालक आहे. रोल्स रॉयसपासून ते मर्सिडीज मेबॅकपर्यंतच्या गाड्यांच्या ताफ्यासह रमेश बाबू यांची नेटवर्थ आज १२०० कोटींच्या घरात आहे.

१३ व्या वर्षी खांद्यावर कुटुंबाची जबाबदारीरमेश बाबू यांचा प्रवास अत्यंत संघर्षातून सुरू झाला. वडिलांच्या निधनानंतर घरची आर्थिक ओढाताण सुरू झाली. अवघ्या १३ वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांनी वर्तमानपत्रे वाटली, दूध विकले आणि वडिलांचे छोटेसे सलूनही सांभाळले. दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी सलूनमध्ये काम, असा त्यांचा खडतर प्रवास सुरू होता. मात्र, याच काळात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण करून शिक्षणाची जिद्दही सोडली नाही.

एका मारुती ओम्नीने बदलले नशीब१९९३ मध्ये रमेश बाबू यांनी साठवलेल्या पुंजीतून आणि चुलत्यांच्या मदतीने पहिली मारुती ओम्नी व्हॅन खरेदी केली. ही गाडी त्यांनी भाड्याने देण्यास सुरुवात केली. स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करत असतानाच त्यांनी व्यवसायाची नस ओळखली आणि “रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स”ची मुहूर्तमेढ रोवली.

लक्झरी गाड्यांचा बादशाह!२००४ मध्ये रमेश बाबू यांनी धाडस करून पहिली मर्सिडीज-बेंझ ई-क्लास खरेदी केली. इथूनच त्यांच्या व्यवसायाला वेगळी दिशा मिळाली. कॉर्पोरेट क्लायंट्स आणि सेलिब्रिटींना प्रीमियम गाड्यांची गरज असते, हे ओळखून त्यांनी आपल्या ताफ्यात महागड्या गाड्या वाढवल्या. आज त्यांच्याकडे रोल्स-रॉयस घोस्ट, मेबॅक, जग्वार, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या गाड्या आहेत. एकूण गाड्यांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे, ज्यात विंटेज कार आणि मिनीबसचाही समावेश आहे.

वाचा - जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या? टॉप १० मध्ये किती भारतीय?

अफाट संपत्ती, तरीही पाय जमिनीवररमेश बाबू यांच्या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधेपणा. १२०० कोटींचे साम्राज्य असूनही, ते आजही दररोज त्यांच्या जुन्या सलूनमध्ये जातात. विशेष म्हणजे, आजही ते आपल्या जुन्या ग्राहकांचे स्वतः केस कापतात. "माझा भूतकाळ मला संघर्षाची आठवण करून देतो आणि साधे राहायला शिकवतो," असे ते अभिमानाने सांगतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : From Milkman to Millionaire: Ramesh Babu's Inspiring Success Story

Web Summary : Ramesh Babu, once a milk and newspaper delivery boy, now owns 400 luxury cars. Starting with a Maruti Omni, he built Ramesh Tours & Travels, amassing a ₹1200 crore net worth while staying grounded and working at his old salon.
टॅग्स :व्यवसायकार